डॉ. बाबासाहेब आंबेडकर. (अल्पपरीचय)
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ (jurist), अर्थशास्त्रज्ञ (economist), राजनीतिज्ञ (politician), तत्त्वज्ञ (Philosopher) आणि समाजसुधारक (social reformer) होते. त्यांनी बहुजन चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (untouchable) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री (Minister of labor of British India), स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री (First Minister of law and justice of Independent India), भारतीय संविधानाचे शिल्पकार (Architect of Indian Constitution), भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक (Revivalist of Indian Buddhism) होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या बाबासाहेबांच्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही संबोधले जाते. बाबासाहेब आंबेडकर यांनी अमेरीकेतील कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र ...